पिंपरी : पत्रा उचकटून कंपनीत चोरी | पुढारी

पिंपरी : पत्रा उचकटून कंपनीत चोरी

पिंपरी : पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीतून एक लाख 5 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना, एमआयडीसी भोसरी परिसरातील स्पेक्ट्रम मेक टेक्नॉलॉजीस या कंपनीत 1 जून रोजी घडली.

याप्रकरणी रवीकुमार नागेश्वरराव येडीडा (40, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी मधील स्पेक्ट्रम मेक टेक्नॉलॉजीस या कंपनीच्या पाठीमागील बाजूचा पत्रा काढून अज्ञात चोरट्यांनी आतील एक लाख 5 हजार रुपये किमतीचे तीन मीटर लांबीचे स्टीलनेस बार, स्टेनलेस शीट्स चोरून नेले.

Back to top button