पिंपरी : जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी | पुढारी

पिंपरी : जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी

पिंपरी : प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात पोहताना बुडून अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याचा 9 मे रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर हा तलाव सर्वांसाठीच बंद ठेवण्यात आला आहे.

बारामती : तलाठी, ग्रामसेवक दाखवा; एक हजार रुपये मिळवा, संतप्त वाकी ग्रामस्थांकडून गावात फलक

याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडली, म्हणून जलतरण तलाव बंद ठेवणे हा काही उपाय होऊ शकत नाही. कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जलतरण तलाव जवळपास दोन वर्ष बंद ठेवण्यात आले होते. यामुळे लहान मुलांना पोहण्यापासून वंचित रहावे लागले होते. त्यानंतर सरकारने सर्व तलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात पुन्हा एखादी दुर्घटना घडल्यामुळे तलाव बंद ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघासह विलास रासकर, रवींद्र काळे, जितेंद्र निखळ यांनी केली आहे.

Back to top button