पिंपरी : शहरात तुरळक पावसाची हजेरी | पुढारी

पिंपरी : शहरात तुरळक पावसाची हजेरी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होवून ढग दाटून आले. दोन दिवस वाढलेल्या उकाड्यामुळे जोरदार पाऊस येईल, अशी आशा नागरिकांनी होती. मात्र, सुरुवातीला पावसाचा नुसताच शिडकावा होवून शहरातील काही भागात तुरळक पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची निराशा झाली.

उकाड्याने हैराण पिंपरी चिंचवड शहरवासीय पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण गेली दोन महिने 40 ते 43 अंश तापमानाने अंगाची लाही लाही होणार्‍या वातावरणाला शहरवासीय वैतागले आहेत. सध्या जून महिना सुरू झाला आहे. तापमान कमी झाले तरी उकाडा कमी झालेला नाही. एकतरी जोरदार पाऊस पडावा आणि वातावरण थंड व्हावे अशी आशा लागून राहिलेल्या नागरिकांना पावसाच्या वातावरणाने थोडा दिलासा मिळाला.

ढगाळलेल्या वातावरणाने होणार्‍या गडगडाटामुळे जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. पण पुन्हा वातावरणात बदल होवून तुरळक पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

 

Back to top button