पुणे : अतिरिक्त 19 लाखांचे चेक बाऊन्स, वाचा सविस्तर | पुढारी

पुणे : अतिरिक्त 19 लाखांचे चेक बाऊन्स, वाचा सविस्तर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कामाची रक्कम दिली असताना अतिरिक्त 18 लाख 88 मागणी करत अनामत रक्कम म्हणून ठेवण्यास दिलेले 32 लाखांचे धनादेश पूर्व कल्पना देता बँकेत भरून बाऊन्स केल्याप्रकरणी हैद्राबाद येथील एकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारंपरिक भात बियाण्यांना वाढती मागणी

गुरमीतसिंग जोरासिंग धालीवाल (59, रा. कोमपल्ली, हैद्राबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गिरीधारी बाजीराव डहाळे (50,मॉडेल कॉलनी,शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 मार्च 2021 ते 15 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडला. फिर्यादी डहाळे व गुरमीतसिंग एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

सोलापूर : तालुक्याच्या ‘दक्षिण’ भागास मृग नक्षत्राने झोडपले

फिर्यादी हे रल्वेचे ब्लॉक बसविणे, पाई लाईन टाकण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेताता. ही कामे ते गुरमीतसिंग याला करण्यास देत होते. त्यांनी अनामत स्वरूपात गुरमीतसिंग याच्याकडे 32 लाखांचे तीन धनादेश दिले होते. डहाळे यांनी गुरमीत बरोबरचा हिशोब पुर्ण करून त्याला धनादेशाची मागणी केली असता गुरमीतसिंग याने डहाळे यांच्याकडे अतिरिक्त 18 लाख 88 हजारांच्या बीलाची मागणी केली. हे सर्व प्रकार झाल्यानंतर गुरमीतसिंगने त्याच्याकडे डहाळे यांनी ठेवण्यास दिलेले धनादेश बँकेत भरून ते बाऊन्स केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button