पुणे : महाळुंगेला गोळीबार; पाच जणांवर गुन्हा | पुढारी

पुणे : महाळुंगेला गोळीबार; पाच जणांवर गुन्हा

चाकण : पुढारी वृत्तसेवा

चाकण औद्योगिक भागातील महाळुंगे (ता. खेड) येथे एका युवकावर गोळीबार करण्यात आला. सदर घटना गुरुवारी (दि. २) मध्यरात्री महाळुंगे इंगळे गावातील भोसले वस्ती येथे घडली. वैभव गायकवाड (वय २१, रा. महाळुंगे इंगळे, भोसले वस्ती, ता.खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलिस चौकीत तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल फलके याच्यासह महेश शिंदे, योगेश बोत्रे व आणखी दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव गायकवाड यांच्या घरासमोर राहुल फलके याच्यासह पाचजण आले. त्यांनी वैभव यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबारानंतर पाचही आरोपी पळून गेले. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून हा प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा

राज्यसभा सहावी जागा : कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार ‘दंगल’

कोरोनामध्ये छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निकमध्ये २ जागा राखीव

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

Back to top button