नांदेड : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

नांदेड- लातूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतुकीची कोंडी झाली
नांदेड- लातूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतुकीची कोंडी झाली

माळाकोळी (नांदेड) : पुढारी वृत्तसेवा – ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या इतर मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी माळाकोळ तालुका लोहा येथे गुरुवारी दि. २० रोजी दुपारी नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

अधिक वाचा –

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकारने धक्का लावू नये, या मागणीसाठी वाड गोंधळी जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळाकोळी येथे नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्र सरकारने आंदोलनाची दखल घेण्यासाठी व लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला.

अधिक वाचा –

यापुढे लक्ष्मण हाके यांच्या मागणीला महाराष्ट्र सरकारने जर दखल घेतली नाही तर सकल ओबीसी समाजाच्या वतीने राज्यात सर्वत्र रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते ज्ञानेश्वर गीते यांनी यावेळी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले.

अधिक वाचा –

या आंदोलनात ज्ञानेश्वर गीते, परमेश्वर मुरकुटे, कालिदास मुस्तापुरे, सचिन बल्लोरे, कृष्णा केंद्रे, रामेश्वर केंद्रे, दत्ता चाटे, लक्ष्मण केंद्रे, सुशांत लोहारे, परमेश्वर तिडके, संतोष केंद्रे यांनी सहभाग घेतला. माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलकत्रीवार यांनी निवेदन स्वीकारून महामार्ग सुरळीत करून दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news