पुणे : देशपांडे उद्यानातील चेंजिंग रूम अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : देशपांडे उद्यानातील चेंजिंग रूम अंतिम टप्प्यात

सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा

वेडिंग फोटो शूटसाठी प्रसिद्ध असणार्‍या पु. ल. देशपांडे उद्यानात अत्याधुनिक चेंजिंग रूम तयार करण्यात येत असल्याने आगामी काळात हे उद्यान फोटो शूटसाठी हक्काचे ठिकाण बनणार आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

पु. ल. देशपांडे उद्यान हे जपानच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. समतल हिरवळ, कारंजे, नानाविध लावलेली आणि जोपासलेली झाडे यामुळे प्री-वेडिंग फोटो शूटसाठी लागणार्‍या सर्वच गोष्टी या उद्यानात उपलब्ध आहेत. त्यामुळे सातत्याने येथे फोटो शूटची नोंदणी केलेली असते. दिवसभरात किमान एक, कधी कधी 2-3 फोटो शूट सुरू असतात.

COVID19 | देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत ३,७१२ नवे रुग्ण

प्री-वेडिंगमध्ये अनेकदा कपडे बदलले जातात. स्वच्छतागृहाजवळ असणार्‍या जागेत कपडे बदलावे लागायचे. यात अनेकदा महिलांना विशेष काळजी घ्यावी लागायची. मात्र, आता चेंजिंग रूमच्या निर्मितीमुळे हा प्रश्न नकाली लागणार आहे. यामुळे उद्यान विभागाच्या महसुलातदेखील वाढ होईल. ‘चेंजिंग रूमच्या आसपास असणारी झाडेदेखील बागेच्या वैभवात भर टाकणारी आहेत,’ असे उद्यान निरीक्षक कैलास भालेराव यांनी सांगितले.

काश्मिरी पंडितांकडून आजही स्थलांतराचा विचार होतोय : संजय राऊत

वूडन फर्निशिंग आणि आकर्षक साईन बोर्ड

या ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम असून बांधकामासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. बाहेरील बाजूस आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. मुख्य भिंतीला आकर्षक एलईडी साईन बोर्ड लावण्यात येणार असून आगामी काही दिवसात चेंजिंग रूम खुली करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता ईश्वर ढमाले यांनी सांगितले.

Back to top button