COVID19 | देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत ३,७१२ नवे रुग्ण | पुढारी

COVID19 | देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत ३,७१२ नवे रुग्ण

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,७१२ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,५८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होऊन ती १९,५०९ वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.८४ टक्के आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आतापर्यंत १९३ कोटी ७० लाख ५१ हजार १०४ डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, मुंबईत जवळपास चार महिन्यांनंतर ७०० अधिक हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १ हजाराच्या वर गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत ५२ टक्के वाढ दिसून आली आहे. मंगळवारी मुंबईतील रुग्णसंख्या ४६ टक्क्यांनी वाढली आहे.

देशात मंगळवारी दिवसभरात २ हजार ७४५ कोरोनाबाधितांची (COVID19) भर पडली होती. तर, ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान २ हजार २३६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा दैनंदिन संसर्गदर ०.६० टक्के आणि आठवड्याचा संसर्गदर ०.६३ टक्के नोंदवण्यात आला होता.

Back to top button