पिंपरी : चार्जिंग स्टेशनला प्रतीक्षा ग्राहकांची; व्यावसायिकांच्या चिंतेत भर | पुढारी

पिंपरी : चार्जिंग स्टेशनला प्रतीक्षा ग्राहकांची; व्यावसायिकांच्या चिंतेत भर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

शहरात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना चार्जिंग स्टेशन सुरू केलेल्या व्यवसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत. अधून-मधून किमती कमी-जास्त होत असल्या तरी 100 रुपयांच्या पुढेच दर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडी खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.

गेल्या काही महिन्यांत शहरात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढल्याने शहरात चार्जिंग स्टेशनचा व्यवसायाला सुरुवात झाली आहे; परंतु गुंतवणुकीच्या तुलनेत ग्राहक चार्जिंग स्टेशनकडे फिरकले नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. गाड्यांची संख्या वाढलेली दिसत असताना ग्राहक येत नसल्याने गुंतवणूक कधी वसूल होणार, असा प्रश्न चार्जिंग स्टेशन मालकांना पडला आहे.

निखतचा गोल्डन पंच!

व्यावसायीकांच्या अपेक्षा

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्याने चार्जिंग स्टेशनला प्रतिसाद मिळेल. गाडी चार्ज करण्यासाठी साधारणत: 300 ते 350 रुपये खर्च येत असल्याने लांब जाणारे ग्राहक स्टेशनवर येतील; परंतु प्रत्यक्षात स्टेशन सुरू करून सहा महिने झाले तरी अपेक्षेप्रमाणे ग्राहक गाडी चार्ज करून घेण्यासाठी आलेच नाहीत. अनेक सोसायटीमध्ये अद्याप गाडी चार्जिंग सुविधा नसल्याने चार्जिंग स्टेशनला ग्राहक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती.

चार्जिंगसाठी येणार्‍या गाड्याची संख्या अत्यल्प

शहरात तसेच महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहेत. यातील ठराविक ठिकाणी दिवसाला 2-3 गाड्या चार्जिंगसाठी येत आहेत, तर अनेक ठिकाणी दोन दिवसांतून एखादी गाडी चार्जिंगसाठी येत आहे.

ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करा : भोसले

व्यावसयिक अडचणीत

व्यावसायिकांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 20- 25 लाख खर्च आला आहे. ज्यांनी जागा भाड्याने घेतली आहे. त्यांच्या खर्चात वाढ होत आहे. रोज इलेक्ट्रिसिटी, मनुष्यबळ खर्च येतो. त्यामुळे ग्राहक प्रतिसाद देत नसल्याने व्यवसाय सुरु ठेवायचा कसा, असा प्रश्न चार्जिंग स्टेशन चालकांना पडला आहे.

महामार्गालगत चार्जिंग स्टेशन सुरू करून देखील प्रतिसाद मिळत नाही. सोसायटीमध्ये अद्याप चार्जिंग सुविधा नसल्याने ग्राहक येतील अशी अपेक्षा होती.

-व्यावसायिक

हेही वाचा

बिल्डरांना धमकावणारा ठग पोलिसांच्या जाळ्यात: खंडणी, गुंडाविरोधी पथकाची संयुक्त कारवाई

नाशिक : अंजनेरी की, किष्किंधा? हनुमान जन्मस्थळावरून साधू-महंतांमध्ये वादंग

पिंपरी : आयुक्तांचा 14 कलमी करेक्ट कार्यक्रम : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेनऊशे गुन्हेगारांची कोंडी

Back to top button