पुणे : मुंबई-पुणे रस्ता रुंदीकरणासाठी 40 कोटी | पुढारी

पुणे : मुंबई-पुणे रस्ता रुंदीकरणासाठी 40 कोटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणार्‍या जुन्या मुंबई-पुणे महामार्गातील हॅरिस ब्रिज ते रेंजहिल्स (अंडी उबवणी केंद्र) चौकापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश 2030 पर्यंत ड्रोन हब

बोपोडी येथील हॅरिस ब्रिज पासून खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील रेंजहिल्स चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने 2016 मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्या कडेला बोपोडी येथे राहाणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले; परंतु खडकी रेल्वे स्टेशनपासून रेंजहिल्स चौकापर्यंत रस्त्याच्या कडेची जागा संरक्षण विभागाकडून मिळत नव्हती, त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडले होते.

शरद पवार यांनी दुरूनच घेतले ‘दगडूशेठ’चे दर्शन

विशेष असे की, खडकी रेल्वे स्टेशनमुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या जागेशिवाय रुंदीकरणासाठी पर्याय नव्हता. दरम्यान, स्वारगेट- पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गही याच रस्त्यावरून जाणार असल्याने भूसंपादनाअभावी मेट्रोचेही काम रखडले होते. त्यांनाही संरक्षण विभागाच्या जागेची गरज होती. या दोन्ही प्रकल्पांसाठी 10 एकर जागेची गरज असून तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या जागेच्या बदल्यात येरवडा येथील महापालिकेची तेवढीच जागा संरक्षण विभागाला देण्याची तयारी दर्शविली होती.

मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द फिरविला!

यावर मागील आठवड्यात संरक्षण विभागाने निर्णय घेत रस्ता रुंदीकरण व मेट्रोसाठीही जागा देण्यास मान्यता दिली. रस्ता रुंदीकरणासोबतच मेट्रोच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. त्यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जागेची पाहणी केली. तसेच 2016 मध्ये कामाची निविदा ज्या ठेकेदाराला मिळाली होती, त्याने मागील पाच वर्षांतील दरवाढीनुसार काम करणे अशक्य असल्याचे कळविले. त्यामुळे प्रशासनाने या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला असून 40 कोटी रुपयांचे एस्टीमेटही तयार केले आहे.

हेही वाचा

शिवसेनेला रोखण्याची राज ठाकरे यांची रणनीती

पुणे : अशी आहे एसटीची पहिली ‘शिवाई’ ई-बस; एक जूनपासून धावणार या मार्गाने

सोशल मीडियावरही जुनैदचे गौडबंगाल; बनावट अकाउंट, निधीबाबत कसून चौकशी

Back to top button