पिंपरी : प्रभागरचनेबाबत उत्सुकता वाढली | पुढारी

पिंपरी : प्रभागरचनेबाबत उत्सुकता वाढली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने निवडणुकीसाठी नव्याने प्रारुप प्रभागरचना तयार करा, असे आदेश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कामकाज सुरू केले आहे; मात्र, प्रभाग दोन, तीन की, चार सदस्यीय होणार याची उत्सुकता माजी नगरसेवकांसह इच्छुकांना लागली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला. ओबीसीशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत, ही राज्य सरकार आणि विरोधकांचीही भूमिका होती.

‘युपीएससी’च्या अध्यक्ष निवडीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

त्यामुळे राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केले. त्यानुसार प्रभाग रचना, निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार सरकारने स्वत:कडे घेतले. त्याचे कायद्यात रुपांतर झाल्याने अधिसूचना प्रसिद्ध करत शासनाने तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली.

राज्य शासनाने पालिकेला नव्याने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यास तत्काळ सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2021 आणि 27 जानेवारी 2022 च्या आदेशनुसार कामकाजाची सूचना पालिकेस 11 एप्रिलला दिले आहेत.

Ranbir-Alia Wed pics : कपूर फॅमिलीने सुनेचं केलं असं स्वागत

त्यानुसार त्रिदस्यसीय प्रभाग रचना असणार असे स्पष्ट होत आहे. मात्र, कामकाज कधीपर्यंत पूर्ण करून आराखडा राज्य सरकारकडे पाठवायचा. त्याबाबत वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

Back to top button