दहावीचा पेपर सुरळीत; विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले | पुढारी

दहावीचा पेपर सुरळीत; विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेचा मंगळवारी पहिला पेपर होता. शहरातील 140 केंद्रावरती ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर काळजी दिसत होती. परंतु पेपर सुरळीत पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलले.

बैठक क्रमांक शोधण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. पहिला पेपर मराठी विषयाचा होता मात्र, तरीही कसा असेल या भावनेने थोडी धाकधुक व भिती दिसत होती.

सातारा : पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड

काही परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांची परीक्षेची भिती कमी व्हावी या उद्देशाने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे कॉपी किंवा गैरप्रकार करण्यास वाव नव्हता.

परीक्षा केंद्रावर वेळवर पोहचण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे पालक सोडण्यास आले होते. सर्व प्रश्न व्यवस्थित विचार करुन सोडव, वेळेकडे लक्ष दे अशा सूचना पालक करत होते. विद्यार्थ्यास वेळेवर परीक्षा केंद्रावर सोडविण्यासाठी आणि आणण्यासाठी काही पालकांनी परीक्षेकरिता ऑफिसला देखील रजा टाकली होती.

उन्हाळ्यात आरोग्यदायी ‘जिरे’; फायदे ऐकूण थक्क व्हाल

परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी मित्र -मैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा पेपर कसा गेला म्हणून विचारपूस केली. यंदा दहावीच्या परीक्षेत दोन पेपरमध्ये सुट्ट्या देण्यात आल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेन्शत थोडे कमी झाले आहे.

ज्यादा वेळ देऊनही पेपर वेळेत पूर्ण नाहीच..

बारावीप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही लिखाणाचा सराव राहिला नसल्याने ज्यादा वेळ देवूनही बहुतांश विद्यार्थ्यांना पेपर वेळेत पूर्ण करता आला नाही.

शपथविधीनंतर भगवंत मान म्‍हणाले, “आमदार झालो म्‍हणून…”

पहिला पेपर मराठीचा होता त्यामुळे फार टेन्शन नव्हते. शाळेत सराव परीक्षे दरम्यान लिखाणाची प्रॅक्टिस झाली होती. पण तरीही शेवटच्या तासाला घाई करावी लागली.

त्यामुळे मला पेपर वेळेत पूर्ण करता आला. पण आमच्यातील बर्‍याच विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव राहिलेला नाही अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून येत होत्या.

 

Back to top button