सातारा : पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड | पुढारी

सातारा : पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड

पिंपोडे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा : पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाघोली (ता. कोरेगाव) येथील रोहित पोपट शिंदे (वय २६ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारांसाठी पिंपोडे बुद्रुक येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

त्यावेळी त्याठिकाणी जमावाने गोंधळ घातला. नंतर पुन्हा मृत युवकास घेऊन जमाव ग्रामीण रुग्णालयात गेला. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनीही त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या, सॅनिटायझर मशीन फोडले, महिला प्रसूती गृहाच्या खोलीचा दरवाजा फोडला, तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे दवाखान्यात अॅडमिट असलेल्या रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले झाले. रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांवर ही जमावाने दहशत निर्माण केली. संबंधित घटनेची माहिती रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेल्या डॉक्टरानी वाठार स्टेशन पोलिसांना दिली.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : भारतात स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. निहारिका प्रभू |

Back to top button