शपथविधीनंतर मुख्‍यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया म्‍हणाले, “आमदार झालो म्‍हणून…”

शपथविधीनंतर मुख्‍यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया म्‍हणाले, “आमदार झालो म्‍हणून…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केलेल्‍या आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी आज मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. शहीद भगतसिंग यांचे जन्‍मगाव खातकर कलान येथे राज्‍यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी त्‍यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते राज्‍याचे २५ वे मुख्‍यमंत्री ठरले आहेत. शपथविधी कार्यक्रमावेळी  दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍यासह आम आदमी पार्टीच्‍या प्रमुख्‍य नेते उपस्‍थित होते.

"ज्‍यांनी मतदान केले नाही त्‍यांचाही आदर करा"

यावेळी आपच्‍या नूतन आमदारांना मान म्‍हणाले की, " विजय झालो म्‍हणून कोणीही गर्व करु नका. ज्‍यांनी आपला मतदान केले नाही त्‍यांचाही आदर आपणास करावयाचा आहे. आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्‍यासर्व पक्षातील सर्वांचे मी आभार मानतो"

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले. आपचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवारी भगवंत मान हे तब्‍बाल ४५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर पक्षाला ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळला होता. या विजयानंतर पंजाबमधील सर्व सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो असेल, अशी घोषणा भगवंत मान यांनी केली होती. भगवंत मान हे सर्वात तरुण दुसरे मुख्‍यमंत्री ठरले आहेत. पंजाबचे सर्वात तरुण मुख्‍यमंत्री होण्‍याचा बहुमान प्रकाशसिंग बादल यांच्‍या नावावर आहे.

हेही वाचलं का?

logo
Pudhari News
pudhari.news