पुणे : उबाळेनगर येथील तलावात २ मुलांचा बुडून मृत्यू | पुढारी

पुणे : उबाळेनगर येथील तलावात २ मुलांचा बुडून मृत्यू

वाघोली (पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असणाऱ्या तलावात १५ वर्षीय २ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. दोन्ही मुलांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी पाणबुड्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
मनोज मंगेश सातपुते (वय १५), जयराज रामकिशन टाक (वय १५. दोघेही रा. थिटे वस्ती, खराडी) असे तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, उबाळेनगर येथील तलावात पोहण्यासाठी ७ ते ८ मुलांचा ग्रुप आला होता. यापैकी दोघेजण तलावाच्या पाण्यात बुडाले. सदरची घटना घडल्यानंतर लोणीकंद पोलीस, वाघोली पीएमआरडीए व पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह मिळाले नाही. सकाळी ८ च्या सुमारास निखील शिवतारे, ऋषिकेश शिवतारे, दीपक निषाद यांच्या पथकातील पाणबुड्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Back to top button