पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर मेट्रोची दिवसभर ट्रायल | पुढारी

पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर मेट्रोची दिवसभर ट्रायल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महामेट्रोच्या वतीने फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोची बुधवारी (दि.16) दिवसभर ट्रायल रन घेण्यात आली. वेगात ये-जा करणार्‍या मेट्रोकडे नागरिक व वाहनचालक उत्सुकतेने पाहत होते.

फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन या 5.80 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रोतून प्रवासी वाहतुक सुरू करण्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) परवानगी 6 जानेवारीला मिळाली आहे.

सटाणा : शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग

त्याच महिन्यात मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इरादा महामेट्रोने व्यक्त केला होता. तरीही अद्याप मेट्रो वाहतुकीस खुली न झाल्याने उलटचर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनीं घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

आमचे साहेब कुटूंब वत्सल : प्रतिक जयंत पाटील

दरम्यान, उद्घाटनाची तारीख केव्हाही मिळू शकते म्हणून पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान आज दिवसभर मेट्रोची ट्रायल घेण्यात आली.

हॉर्न वाजवत वेगात एलेव्हटरवरून धावत असलेली मेट्रो अनेक जण कुतूहलाने पाहत होते. काहींनी छायाचित्र तर, व्हिडिओ रेकॉर्डीग केले.

 

Back to top button