बारामती : नीरा-बारामती रस्त्यावर दुचाकी झाडाला धडकून शालेय विद्यार्थी ठार | पुढारी

बारामती : नीरा-बारामती रस्त्यावर दुचाकी झाडाला धडकून शालेय विद्यार्थी ठार

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा

नीरा-बारामती या राज्य मार्गावर शुक्रवारी (दि. ४) मोटारसायकल झाडावर आढळून झालेल्या अपघातात प्रथमेश नामदेव गायकवाड (वय १७, रा. सोरटेवाडी, ता. बारामती) या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर मयुर हिंदुराव सोरटे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Prathamesh Gaikwad
प्रथमेश गायकवाड

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता सहा फाटा येथे ही घटना घडली. याबाबत नामदेव महादेव गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या करंजेपुल चौकीत अपघाताची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, प्रथमेश गायकवाड व मयूर सोरटे हे दोन्ही विद्यार्थी सकाळी आपल्या दुचाकीवरून खासगी शिकवणीला निघाले होते. शाळेत जात असताना त्यांची दुचाकी झाडावर
धडकल्याने अपघात झाला.

बुल्‍ली-सुल्‍ली ॲपचा राज्यसभेत मुद्दा उपस्‍थित

या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोमेश्वर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी प्रथमेश गायकवाड याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषीत केले. तर मयूर सोरटे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार आहेत. या घटनेचा तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहेत.

हेही वाचा

मध्य रेल्वे : विशेष पॉवर ब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द

पुष्पा स्टाइलमध्ये लालचंदन तस्करीचा प्रयत्न फसला 

बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Back to top button