एसटीचा हिवाळी हंगाम वाया | पुढारी

एसटीचा हिवाळी हंगाम वाया

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनंतर सुरू झालेल्या कर्मचार्‍यांच्या संपाचा मोठा तोटा एसटी प्रशासनास बसला आहे. ऐन हिवाळीचा पर्यटनाचा हंगाम वाया गेला आहे. तर, लग्नसराईनिमित्त होणारे बुकिंग, विशेष फेर्‍यातून उत्पन्नही मिळाले नाही.

या पूर्वी हिवाळीचा हंगामात दिवसाला मिळणारे लाखोंचे उत्पन्न आता केवळ काही हजारांवर आले आहे. तीन महिन्यांपासून अंतर्गत असणारे एसटीचे सुट्टे पार्ट खरेदी, डिझेल आवक आणि इतर तांत्रिक बाबी पूर्णपणे कोलमडल्या आहेत.

नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची एक लाखात विक्री

पर्यटन, लग्नसराईपासून एसटी दूरच

कोरोनामुळे निर्बंध असल्याने एसटीची सेवा जानेवारी 2021 पहिल्या आठवड्यापासून जवळपास 85 टक्क्यांनी सुरू झाली होती. या काळात ग्रामपंचायत निवडणुका आणि कोकणातील फेर्‍यांची संख्या तुलनेने अधिक वाढली होती.

त्यामुळे हिवाळ्यातील हा काळ एसटीसाठी अधिक फायदाचा ठरला होता. तर, अष्टविनायक आणि साडेतीन शक्तीपीठसाठी विशेष गाड्याही सोडण्यात आल्या होत्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील रेकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे

दरम्यान, गेल्या काही आठवड्यापासून चार मार्गांवर सुरू असलेल्या फेर्‍यात वाढ होत नाही. तर, इतर आगारातून येणार्‍या बसची संख्या टप्प्याटप्यानी वाढवली आहे.

मात्र, तेथून निघणारी एसटी नेमक्या कोणत्या वेळेत येईल, तर येईल का नाही याचीही शाश्वती अनेकांना नसल्याने एसटीच्या फेर्‍यांचा लाभ अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रवाशांना होत असल्याचे दिसून येत आहे.

किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्‍ता ‘या’ दिवशी शेतकर्‍यांना मिळणार

संपाचा परिणाम, एसटी आगारातच धूळ खात

किरकोळ अपघात वाढले

एसटीचे वाहक व चालक संपावर असल्याने दुसरीकडे एसटीच्या फेर्‍या सुरू केल्या आहेत. त्यामुळे खासगी चालकांना बोलावून त्यांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग देण्यात आले आहेत. मात्र, या आठवड्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एसटीचे किरकोळ दोन अपघात झाले आहेत.

किरण माने उद्या करणार अनेक ‘गौप्यस्फोट’

आरक्षण बंद, तिकिटाने विक्री

एसटीचे आरक्षण खिडकी पूर्ण बंद असल्याने केवळ तिकिटाद्वारे प्रवाशांना तिकीट देण्यात येत आहे. मात्र, आरक्षण नसल्याने अनेकांना नेमकी एसटी येणार का, याची खात्री नाही. विशेष म्हणजे एसटीच्या चौकशी गृहात एसटीच चौकशी करण्यासाठी जमलेले प्रवासीही गोंधळलेले होते.

Back to top button