किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्‍ता ‘या’ दिवशी शेतकर्‍यांना मिळणार | पुढारी

किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्‍ता 'या' दिवशी शेतकर्‍यांना मिळणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्‍ता गेल्या जानेवारी महिन्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. या योजनेचा पुढील म्हणजे ११ वा हप्‍ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ग केला जाण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकर्‍यांना मदत स्वरुपात दिले जातात. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात ही रक्‍कम दिली जाते. योजनेचा दुरुपयोग टाळण्यासाठी पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात सरकारकडून वरचेवर आवश्यक ते बदल केले जातात.

यापुढे ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर रेशनकार्डची माहिती देणे गरजेचे आहे. जे शेतकरी ही माहिती देणार नाहीत, त्यांना अकरावा हप्‍ता मिळण्याची शक्यता कमी असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button