अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या | पुढारी

अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या

जव्हार : पुढारी वृत्तसेवा

जव्हार तालुक्यातील जामसर (वडपाडा) गावातील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह 16 जूनला आढळून आला होता. या विद्यार्थिनीवर अत्याचार करून दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तात्काळ
तपास करून जव्हार पोलिसांनी दोन आरोपींना 48 तासांत तुरुंगात धाडले.

या घटनेचा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार बोईसर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला. आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नसतानाही त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. एका बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरीवर काम करणार्‍या 19 वर्षीय आणि दुसर्‍या 21 वर्षीय आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी मुलीचा तांबडमाळ जवळील शेताजवळ पाठलाग करून अतिप्रसंग केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली.

दहावीचा निकाल तिला पाहता आला नाही

पीडित विद्यार्थी अतिशय हुशार होती. तिने दहावीची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल शुक्रवारी लागला असून तिला 68 टक्के
मिळाले. मात्र हा निकाल पाहण्यास ती जिवंत नसल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Back to top button