नाशिक : मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कारवाई; सुरगाणा नगरपंचायतचा इशारा | पुढारी

नाशिक : मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कारवाई; सुरगाणा नगरपंचायतचा इशारा

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित मालमत्ता धारकावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी दिली.

सुरगाणा नगरपंचायतच्या वतीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी पटेल यांचे मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सूरू करण्यात आली आहे. सुरगाणा नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जे थकबाकीदार मालमत्ता व पाणीपट्टी भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नगरपंचायत वसुली विभाग सूरू राहणार आहे. तरी थकबाकीदारांनी कराची रक्कम भरून होणारे संभाव्य कार्यवाही टाळावी व नगरपंचायत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी पटेल यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button