Lok Sabha elections 2024 : भाजपची लोकसभेसाठी पाचवी यादी जाहीर; कंगणा रणौतसह, माजी न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांना उमेदवारी | पुढारी

Lok Sabha elections 2024 : भाजपची लोकसभेसाठी पाचवी यादी जाहीर; कंगणा रणौतसह, माजी न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांना उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha elections 2024 : भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्यांमधील जागांसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. एकूण १११ उमेदवारांची ही यादी आहे. या यादीत नवीन चेहऱ्यांमध्ये अभिनेत्री कंगना रणौत आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा समावेश आहे. या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे.
भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी ४०० पारचा नारा दिलेला आहे. आज जाहीर केलेल्या पाचव्या यादीत कंगणा राणौत यांना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी न्यायाधीश पश्चिम बंगालमधील तमलूक मतदारसंघातून लढणार आहेत. तर नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उद्योजक नवीन जिंदाल यांनाही हरयाणातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपने खासदार वरुण गांधी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि व्ही के सिंह यांची नावे वगळली आहेत. तर महाराष्ट्रातील सुनील मेंढे, अशोक नेते, राम सातपुते या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 पाचव्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे

भंडारा-गोंदिया- सुनील मेंढे, गडचिरोली- अशोक नेते, सोलापूर- राम सातपुते

Back to top button