नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले | पुढारी

नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सिन्नर शहरातील एक साठ वर्षीय वृद्ध तसेच तालुक्यातील सुरेगाव येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सिन्नर शहरातील कानडी मळ्यात वास्तव्यास असलेल्या वृद्धाची सिन्नर ग्रामीण रुग्णालयात तर सुरेगाव येथील महिलेची दोडी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. सर्दी, खोकला असा त्रास असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव तसेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button