धुळे : वाडी खुर्दमधून गावठी कट्ट्यासह एकाला ठोकल्या बेड्या | पुढारी

धुळे : वाडी खुर्दमधून गावठी कट्ट्यासह एकाला ठोकल्या बेड्या

धुळे पुढारी : वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द गावातून हत्याराची तस्करी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून दोन गावठी कट्टे व चार काडतूसांसह मोबाईल जप्त करण्यात आला असून शिरपूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द गावात एक युवक गावठी कट्टे विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार सपोनि प्रकाश पाटील , पोसई . योगेश राऊत, तसेच श्रीकांत पाटील , प्रभाकर बैसाणे , संजय पाटील , संदीप सरग योगेश चव्हाण , महेंद्र सपकाळ , मयुर पाटील , तुषार पारधी , कमलेश सूर्यवंशी , राहुल गिरी या पथकाने वाडी खुर्द गाव गाठले . यावेळी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून संशयिताचा शोध घेतला असता अश्विनी बियर बारसमोर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष जाताच एलसीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले.

अधिक चौकशीत त्याचे नाव सुखराम रेतम पवार (वय २३ रा रायचूर , ता . पानसेमल) असे असल्याचे निष्पन्न झाले . पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ ५० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी कट्टे (पिस्टल ), २ हजार रूपये किंमतीचे चार जीवंत काडतूस व ५ हजाराचा मोबाईल मिळून एकूण ५७ हजाराचा मुद्देमाल त्याचे जवळून जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button