MPSC Timetable : एमपीएसी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘हे’ आहे वेळापत्रक | पुढारी

MPSC Timetable : एमपीएसी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘हे’ आहे वेळापत्रक

मुंबई, पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ आणि  २०२२ मधील परीक्षांचे वेळापत्रक MPSC Timetable जाहीर करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक MPSC Timetable आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा , महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा , महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा होणार आहेत.

राज्यसेवा २०२१ ची परीक्षा २ जानेवारी, २०२२ रोजी पूर्व तर ७,८ य ९ मे रोजी मुख्य परीक्षा होणार असून या पूर्व परीक्षेचा निकाल मार्चमध्ये तर मुख्य परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये लागणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १२ मार्च रोजी तर निकाल मे, २०२२ मध्ये, मुख्य परीक्षा २ जुलै, २०२२ तर निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये लागेल.

संबंधित बातम्या

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व २०२१ ही परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी तर निकाल एप्रिल २०२२ मध्ये लागेल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर ९ जुलै, पोलिस उपनिरीक्षक पेपर क्रमांक २ १७ जुलै, पेपर क्रमाक २ राज्य कर निरीक्षक २४ जुलै, पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी ३१ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२२ मध्ये लागेल.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ची पूर्व परीक्षा ३ एप्रिल रोजी तर निकाल मे २०२२ रोजी लागणार आहे.

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट, पेपर क्रमांक २ लिपिक टंकलेखक १३ ऑगस्ट२०२२, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क २० ऑगस्ट, पेपर क्रमांक२ कर सहायक २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०२२ मध्ये लागणार आहे.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ३० एप्रिल रोजी होणार असून जून २०२२ मध्ये निकाल लागेल. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ २४ सप्टेंबर, २०२२, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ १ ऑक्टोंबर, २०२२ रोजी, महाराष्ट्र विद्युत व यात्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ ही परीक्षा २९ ऑक्टोंबर २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षांचे निकाल नोव्हेंबर २०२२ मध्ये लागणार आहेत.
पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१ १६ डिसेंबर २०२२ रोजी तर निकाल २ मे २०२२ मध्ये , मुख्य परीक्षा ३ जुलै, २०२२ तर निकाल सप्टेंबर २०२२ रोजी लागेल. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा २०२१ ६ मार्च रोजी तर निकाल एप्रिल २०२२ मध्ये लागेल.
राज्यसेवा परीक्षा २०२२ची जाहिरात एप्रिलमध्ये प्रसिद्ध होणार आहे. ही परीक्षा १९ जून, २०२२, निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये लागेल. मुख्य परीक्षा १५, १६, १७ ऑक्टोंबर, २०२२ रोजी तर निकाल जानेवारी २०२३ मध्ये लागेल.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ ची जाहिरात मार्च २०२२ मध्ये तर परीक्षा ७ ऑगस्ट २०२२ रोजी निकाल सप्टेंबर २०२२ मध्ये, मुख्य परीक्षा २० नोव्हेंबर रोजी तर निकाल जानेवारी २०२३ रोजी लागणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा २४ डिसेंबर २०२२ रोजी तर निकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये, पेपर क्रमांक २ पोलिस उपनिरीक्षक ३१ डिसेंबर २०२२, पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक ७ जानेवारी २०२३, पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी १४ जानेवारी रोजी होईल. तर निकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये लागेल.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा२०२२ ची जाहिरात जून २०२२ मध्ये प्रसिद्ध होईल, परीक्षा ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी तर निकाल डिसेंबर २०२२ रोजी लागेल.

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ मुख्य परीक्षा ४ फेब्रुवारी २०२३, पेपर क्रमांक २ लिपिक टंकलेखक ११ फेब्रुवारी, २०२३, पेपर क्रमांक २ तांत्रिक सहायक १८ फेब्रुवारी२०२३, दुय्य निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, २५ फेब्रुवारी, पेपर क्रमांक २ उद्योग निरीक्षक ११ मार्च, २०२३ रोजी तर या परीक्षांचा निकाल एप्रिल २०२३ मध्ये लागेल.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची जाहिरात जुलै २०२२ मध्ये प्रसिद्ध होईल, परीक्षा २६ नोव्हेंबर, २०२२ तर निकाल जानेवारी २०२३ मध्ये लागेल.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२२ ही १८ मार्च, २०२३, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ २५ मार्च, विद्युत अभियात्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही २ एप्रिल २०२३, यात्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही ९ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. या परीक्षांचा निकाल मे, २०२३ मध्ये लागणार आहे. तर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२२ ही १६ एप्रिल २०२३, महाराष्ट्र राज्य विद्युत व यांत्रिकी अभियात्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही २३ एप्रिल, २०२३ रोजी होणार आहे. या परीक्षांचा निकाल जून २०२३ मध्ये लागेल.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२ ची जाहिरात जून २०२२ मध्ये तर १० डिसेंबर, २०२२ रोजी निकाल जानेवारी २०२३ मध्ये तर मुख्य परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल जून २०२३ रोजी लागेल.

Back to top button