देश विकणाऱ्यांसोबत राहायचे का ? हे ठरवण्याची वेळ : नाना पटोले | पुढारी

देश विकणाऱ्यांसोबत राहायचे का ? हे ठरवण्याची वेळ : नाना पटोले

नागपूर: पुढारी वृत्तसेवा

देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की वाचवणाऱ्यांसोबत राहायचे, हे आता सर्व राजकीय पक्षांनी ठरवायचे आहे. हीच काँग्रेसची भूमिका आहे, प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना केले.

भाजपाचे सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी देशाचे वाटोळे करायला सुरूवात केली. चीनने अरूणाचलमध्ये अतिक्रमण केले आहे. रोज एक मालमत्ता विकायला काढली असून, भाजपाचे सरकार संवैधानिक चौकट मोडायला निघाले आहे. अशा वेळेस ममता बॅनर्जी यांनी संपुआचे अस्तित्व नाकारणारे वक्तव्य करत, देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प मांडलेला होता. त्यामुळे “सामना’तून देशहिताची भूमिका मांडलेली आहे.

ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य फॅसिस्ट प्रवृत्तीला बळ देण्यासारखे आहे, अशी टीका “सामना’तून करण्यात आली. देशातील परिस्थितीला समजणारे लेखन “सामना’तून झाले आहे, असेही पटोले म्‍हणाले. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊ असे पटोले म्हणाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button