Jalgaon Crime | भुसावळात खंडणीची मागणी करत दोन भावांवर विळ्याने हल्ला | पुढारी

Jalgaon Crime | भुसावळात खंडणीची मागणी करत दोन भावांवर विळ्याने हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ शहरातील ओमकारेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन भावांना खंडणीची मागणी करत लोखंडी विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावली. या प्रकरणी 3 मे रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील ओंकारेश्वर मंदिर येथे रुपेश रवींद्र कानोजे (वय-३२) व त्यांचा भाऊ सुरज कानोजे राहतात. रेल्वे कॉन्ट्रॅक्टरचे काम करतात. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता त्याच परिसरात राहणारा पवान कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल हे दोघे रुपेश कानोजे यांच्या घरी आले. त्यांनी खंडणीची मागणी केली. याला विरोध केला असता पवन मायकल आणि मीनाक्षी मायकल या दोघांनी लोखंडी विळ्याने रुपेश व त्याचा भाऊ सुरज यांच्यावर वार करत जखमी केले. रुपेशच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून घडली. दरम्यान या प्रकरणी 3 मे रोजी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल या दोन्ही वर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.

हेही वाचा  –

Back to top button