कार्यकर्त्यांना ‘बूस्टर डोस’ साठी चंद्रशेखर बावनकुळे मुक्ताईनगरमध्ये | पुढारी

कार्यकर्त्यांना 'बूस्टर डोस' साठी चंद्रशेखर बावनकुळे मुक्ताईनगरमध्ये

जळगाव : पुढारी वृत्तसेवा –  महायुतीचा मुक्ताईनगर मधील संभ्रम काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेला अस्थिरपणा व अचल विचल व काही शंकाकुशंका दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मुक्ताईनगर मध्ये येऊन कार्यकर्त्यांना बूस्टर डोस द्यावा लागला. मुक्ताईनगर येथील साखर कारखाना या ठिकाणी महायुतीची बैठक सुरू असून त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र मीडियाला मध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

मुक्ताईनगर मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्थिरपणा, चल विचल, शंका कुशंका यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मुक्ताईनगर येथील साखर कारखान्यात आयोजित करण्यात आलेली आहे. माहितीच्या पदाधिकाऱ्यांना आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुक्ताईनगर ते शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे हे मार्गदर्शन करीत आहे. खडसे यांनी आपल्या लवकरच भाजपात प्रवेश होणार अशी घोषणा केली होती मात्र अजूनही प्रवेश न झाल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे. मात्र माहिती घेतली असता एकनाथराव खडसे हे बोदवड तालुक्यात आपल्या सुनबाई चा प्रचार करण्यात व्यस्त आहे . तर इकडे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे कार्यकर्त्यांना बूस्टर दोष देण्यात व्यस्त आहे.

खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील होईल संपूर्ण जळगाव जिल्हा ला माहिती आहे. त्यामुळे याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू नये म्हणून स्वतः प्रदेशाध्यक्ष यांनी मुक्ताईनगर मध्ये आज ठाण मांडलेली दिसत आहे.

हेही वाचा –

Back to top button