Jalgaon Crime | रेल्वेतून चोरीला गेलेला दोन लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

Jalgaon Crime | रेल्वेतून चोरीला गेलेला दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव पुढारी वृत्तसेवा- रेल्वे मधून प्रवाशांचे एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या चोरट्यास पकडण्यात आले आहे. रेल्वे पोलीसांनी ही कारवाई केली आहे. संशयितास अटक करण्यात आली असून पुढील तपास रेल्वे पोलीस भुसावळ करीत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ यामध्ये गु.र.क्र.391/2024 गुन्हा दाखल आहे. यामध्ये गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ येथील संशयित आरोपीच्या घरात रेल्वेतून चोरलेल्या वस्तू आढळल्या आहे. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दिवानसिंग राजपुत, बाबू मिर्झा व रेल्वे सुरक्षा बल भुसावळ चे सीपीडीएस नेमणुकीतील आरक्षक महेंद्र कुशवाह व संदिप कुमार असे रेल्वे स्टेशन भुसावळ येथील जळगाव बाजूकडील आऊटर परिसरात तपासकामी गेले असता आऊटर भागात एक इसम संशयीतरित्या मिळून आला. आरोपी विरेश साहेबराव हुसळे, रा, समता नगर, भुसावळ याची चौकशी केली असता तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत होता. अंगझडतीत व त्याच्या राहत्या घरात घरझडतीमध्ये चोरीस गेलेला 1 लाख 85 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही, पोलीस अधिक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड मारूती पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे, भुसावळचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब मगरे, पो.हवा. दिवानसिंग राजपुत, पो.शि. बाबू मिर्झा, RPF भुसावळ नेमणुकीती उप निरीक्षक के. आर. तर्ड, आरक्षक महेंद्र कुशवाह, आरक्षक संदिप कुमार यांनी केलेली आहे.

हेही वाचा –

Back to top button