Onion Export | संपूर्ण कांदा निर्यातबंदी हटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी | पुढारी

Onion Export | संपूर्ण कांदा निर्यातबंदी हटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जानोरी : पुढारी वृत्तसेवाकांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवायला हवी. तेव्हाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी व प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारने 99 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. केंद्र सरकारला हे उशिरा आलेले शहाणपण आहे. या निणर्याचे आम्ही अंशतः स्वागत करतो. परंतु यावर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. एकरी उत्पादन वाढलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये 99 हजारांची अट न टाकता केंद्र सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविण्याची मागणी जगताप यांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत होते. रस्त्यावर उतरत होते. मात्र सरकारने त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, लोकसभा निवडणूका जवळ आल्यावर आता सरकार जागे झाले आहे. आपले उमेदवार पडतील या भीतीने भाजपने कांदा निर्यात बंदी हटवली.  आधी गुजरातच्या पाढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली, त्यावर चौहुबाजुने टीका झाल्यावर मग आता  99 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली या निर्णयाचे स्वागत पण कोणतीही अट न टाकता जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊ द्या अशी मागणी राजु शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचा –

Back to top button