उत्तर कोरियात का आहे लाल लिपस्टिकवर बंदी? | पुढारी

उत्तर कोरियात का आहे लाल लिपस्टिकवर बंदी?

प्योंगयांग : फॅशन आणि सौंदर्याच्या द़ृष्टीने महिलांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लाल लिपस्टिक. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की उत्तर कोरियात मात्र लाल लिपस्टिक लावल्यास कठोर शिक्षा होते. होय, हा विचित्र देश इथे बंदी घातलेल्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. या देशातील हुकूमशहाला लाल लिपस्टिकचा का तिरस्कार आहे हे माहीत आहे का?

उत्तर कोरिया हा असा देश आहे, जिथे लोकांना आपल्या राज्यकर्त्यांनी बनवलेल्या नियमांचे पालन करावे लागते. खरं तर इथल्या हुकूमशाही राज्यकर्त्याने फॅशनशी संबंधितही अनेक नियम बनवले आहेत, जे न पाळल्याबद्दल लोकांना कठोर शिक्षा भोगावी लागते. जगभरात ज्या लाल लिपस्टिकला खूप पसंती मिळते, त्यावरही या देशाने बंदी घातली आहे. लाल लिपस्टिकवर बंदी घालण्याचे कारण म्हणजे येथील हुकूमशहा किम जोंग उन हा लाल रंग भांडवलशाही आणि व्यक्तिवादाशी जोडू पाहतो. तसेच या देशात असे मानले जाते, की लाल रंग एक अशी भावना दर्शवितो ज्याचा अर्थ असा होतो, की स्वत: पेक्षा मोठे कोणीही नाही.

अशा तर्‍हेने किम जोंग उन यांना आपल्या देशातील कोणतीही व्यक्ती राज्यकर्त्यापेक्षा जास्त मोठी नको आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उत्तर कोरियात गस्त घालण्यात येते. येथील पोलिस लोकांच्या वैयक्तिक वस्तूंची तपासणी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि नियम मोडल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे. अशावेळी महिला येथे लालऐवजी लाईट शेड लिपस्टिक लावू शकतात. उत्तर कोरियातील नियम केसांबाबतही अतिशय कडक आहेत. इथे मुली आपले केस वाढवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे केसांना रंगही देऊ शकत नाहीत. किम जोंग उन यांनी पुरुषांसाठी ठरावीक 10, तर महिलांसाठी 18 हेअरस्टाईलला मान्यता दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button