Dhule Crime : चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप | पुढारी

Dhule Crime : चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

धुळे : पुढारी वृत्तसेवा– चारित्र्याच्या संशयातून विवाहितेचा खून करणाऱ्या तिच्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश एसएससी पठारे यांनी सुनावली आहे.

शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथे 24 जून 2001 रोजी ही घटना घडली. योगेश उर्फ भावड्या सोमा धनगर हा त्याची पत्नी दर्शना धनगर वय 25 हिच्या चारित्र्याचा नेहमी संशय घेत होता. या संशयाच्या कारणावरून तो पत्नीस अनेक वेळेस मारहाण देखील करत होता. या छळाला कंटाळून दर्शना माहेरी गेली. मात्र काही नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यामुळे ती पुन्हा नांदण्यासाठी घरी आली. मात्र भावड्या च्या डोक्यात वेगळेच भूत शिरले होते. त्याने 24 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा वाद पुन्हा उकरून काढला. यानंतर त्याने धारदार कोयत्याने दर्शना यांच्यावर वार केले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दर्शना यांना शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. या संदर्भात भावड्या धनगर यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमेश शामराव बोरसे, यांनी केला .व दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.सी. पठारे यांचे न्यायालयातझाले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अजय एस. सानप, यांनी एकुण १३ साक्षीदार नोंदवून युक्तीवाद केला. त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे सादर केले. त्यावरून न्यायालयाने आरोपीने कोयत्याने मारुन खुन केला हे ग्राहय धरून सदर प्रकरणात आरोपीविरुध्द कलम भा.द.वी ३०२ नुसार गुन्हा सिध्द झाल्याने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला तसेच आरोपीने दंड न भरल्यास त्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अजय सानप यांनी कामकाज पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पैरवी अधिकारी पो.कॉ. खंडेराव पवार यांनी मदत केली.

हेही वाचा :

Back to top button