Dhule Crime : ट्रकमध्ये ताडपत्रीच्या आडून गुटख्याची वाहतूक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

Dhule Crime : ट्रकमध्ये ताडपत्रीच्या आडून गुटख्याची वाहतूक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा – गुटख्याची कुडाशी गावाकडून पिंपळनेर गावाकडे होणारी चोरटी वाहतूक पिंपळनेर पोलिसांनी रोखली आहे. या कारवाईत 10 लाख रूपये किंमतीच्या ट्रकसह 1 लाख 80 हजार 778 रूपये किंमतीचा गुटखा मिळून एकूण 11 लाख 80 हजार 778 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

पिंपळनेर पोलीसांना कुडाशी गावाकडुन (एम.एच.14/बी. जे.0328) क्रमांकाच्या ट्रकमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पथकास कारवाईच्या सुचना केल्या. रात्र गस्तीवरील पथकाने पिंपळनेर ते कुडाशी रोड लगत मराठा दरबार हॉटेल जवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले. अधिक चौकशीत चालक मुक्तार अहमद मुंजर अहमद (42) रा. किल्ल्याजवळ मालेगाव, क्लीनर अफजल अहमद मोहम्मद शफिक,(32) रा. आझादनगर मालेगाव अशी नावे समोर आली. वाहनाच्या तपासणीत ताडपत्रीच्या आड गोण्यांमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. 1 लाख 80 हजार 887 रूपये किंमतीचा गुटखा 10 लाख रूपये किंमतीच्या ट्रकसह  पोलिसांनी जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, अमीत माळी, असई पिंपळे, पंकज वाघ व सहकाऱ्यांनी मिळून केली.

हेही वाचा :

Back to top button