Nashik Flower Festival : 9 तारखेपासून महापालिकेत पुष्पोत्सव, ‘या’ अभिनेत्रीच्या हस्ते होणार उद्घाटन | पुढारी

Nashik Flower Festival : 9 तारखेपासून महापालिकेत पुष्पोत्सव, 'या' अभिनेत्रीच्या हस्ते होणार उद्घाटन

नाशिक:पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून येत्या ९ फेब्रुवारीपासून होणाऱ्या पुष्पोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवासाठी स्टॉल्स तसेच स्टेज उभारणीचे काम सुरू झाले आहे.  (Nashik Flower Festival)

पर्यावरण संवर्धनाबरोबरच वृक्ष लागवडीसाठी नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द अभिनेत्री केतकी माटेगांवकर, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुक्रवारी(दि.९) दुपारी ४.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी ‘लागीर झालं जी’ फेम शिवानी बावकर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मक्तेदाराची नियुक्तीही अंतिम झाली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध स्टॉल्स तसेच स्टेजची उभारणी केली जात आहे. (Nashik Flower Festival)

१०३५ प्रवेशिका प्राप्त

पुष्पोत्सवात (Nashik Flower Festival) विविध गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभाग ए गुलाब पुष्पे गटात २५९, विभाग बी गुलाब पुष्पे गटात १४१, विभागी सी गुलाब पुष्पे गटात २४ तर विभाग डी मोसमी बहुवर्षीय पुले गटात ३३४ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. विभाग इ कुंडीतील शोभा वनस्पती गटात १४६, विभाग एफ पुष्परचना गटातून ३४, तर विभाग एच कुंड्यांची सजावट आणि परिसर प्रतिकृती गटातून २४ अशा प्रकारे एकूण १०३५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button