Jalgaon : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यापाऱ्याकडून 43 लाख उकळले | पुढारी

Jalgaon : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यापाऱ्याकडून 43 लाख उकळले

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा- शहरातील हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 43 लाख 3490 रुपये उकळल्याने दोन जणांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिर शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यापाऱ्याला 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान संशयित आरोपी संजय माथुर आणि राहुल शर्मा (बनावट नाव सांगणारे व मोबाईल धारक व बँक खातेधारक) यांनी अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच  युट्युबवर व्हायरल झालेला व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर पैसे द्या म्हणून मागणी केली. तसेच  घरी पोलीस पाठवून तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून 43 लाख 3 हजार 490 रुपयाची खंडणी उकळली. याविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button