Jalgaon News : आयजी पथकाने पकडला 52 लाखाचा गुटखा | पुढारी

Jalgaon News : आयजी पथकाने पकडला 52 लाखाचा गुटखा

जळगाव- जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोपडा बऱ्हाणपूर व इतर मार्गे विमल गुटखा आणण्यात येत आहे. गेल्या वर्षीही अनेक कारवाया करण्यात आल्या. यावर्षीच्या सुरुवातीलाच आयजी पथकाने चोपड्यात सर्वात मोठी कारवाई करून 52 लाखाचा गुटखा व दहा लाखाची गाडी जप्त केली आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखा ही फक्त नावालाच जिल्ह्यात उरलेली आहे का ! असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व अधिकारी ही कारवाई का करू शकत नाही असाही प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश मधून उमर्टी जे की बंदूक बनवण्याच्या कारखान्याचे गाव आहे व ते पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्या मार्गाने चोपडा शहरात विमल गुटख्याने भरलेली गाडी येत आहे. या माहितीच्या आधारे नाशिक परिक्षेत्राचे आयजी बीजी शेखर यांच्या पथकाने मध्यप्रदेश मधून उमर्टी मार्गे चोपडा शहरात आयशर गाडी क्र एम एच- १९ सी वाय ६९७२ येत असताना चोपडा शिरपूर रस्त्यावर चावरा इंग्लिश मेडियम स्कुल जवळ गाडी अडवून विमल पान मसाला, सागर पानमसाला, राजनिवास,व्ही-१ तंबाखू आदी नावाचा गुटखा नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने त्यावर कारवाई केली आहे. तब्बल ५२ लाख ३१ हजार १०४ रुपयांचा गुटखा व आयशर गाडी (क्र एम एच- १९ सी वाय ६९७२) ही १० लाख रुपये किंमतीची गाडी व 30 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल असा एकूण ६२ लाख ६१ हजार १०४ रुपयांची कारवाई माल जप्त करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील आता पर्यतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील पो हे कॉ रवींद्र स्वरूपसिंग पाडवीयाच्या फिर्यादीवरून कल्पेश अशोक साळुंखे (२६)शिंदीगाव ता भडगाव,ललित माधव जाधव(२६) रा.दादावाडी,जळगाव,अमोल युवराज पाटील(२१) तुरटखेडा ता पारोळा, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे आयजी जी बी जी शेखर यांच्या पथकास याबाबतची माहिती मिळते मात्रप्रत्येक जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व अधिकारी असतानाही त्यांना याबाबत सूचना किंवा खबर का मिळत नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा फक्त नावाला राहिली आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button