धुळे : चिंतामणी अपंग कल्याण संस्थेचा सामाजिक प्रेरणादायी उपक्रम | पुढारी

धुळे : चिंतामणी अपंग कल्याण संस्थेचा सामाजिक प्रेरणादायी उपक्रम

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
दिव्यांगांना वेळोवेळी मदत करुन त्यांचा परिवार सुखी-समाधानी राहाण्यासाठी तसेच दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कार्य करणारे साक्री तालुक्यातील दिघावे येथील चिंतामणी अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय राणे व सचिव नरेंद्र पगारे व सर्व टिम तत्पर असतात. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असून मा. शिक्षक नामदेव महाले, दिपाली महाले, फौजी सुनील महाले, कोमल महाले, मातोश्री भागाबाई महाले यांच्यातर्फे एकूण 50 अपंगांना संसारपयोगी साहित्य भेट देऊन मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पारख यांनी मनोगतातून कार्यक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व निसर्ग मित्र समितीचे कार्याध्यक्ष सुरेश पारख होते. प्रमुख पाहुणे म्हणून कासारेचे सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पारख होते. कार्यक्रमास अपंग चिंतामणी कल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय राणे, सचिव नरेंद्र पगारे, उपाध्यक्ष दीपक शेवाळे, सदस्य सुरेश शेवाळे, रुबाब मन्सुरी, लिलाबाई शेवाळे, कलाबाई अहिरे, आत्माराम महाले यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य केले, हिरालाल पारख यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संजय राणे यांनी प्रास्ताविक तर नरेंद्र पगारे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.

Back to top button