Nashik fraud : हळदीच्या प्रोजेक्टसाठी उद्योजकाची १५ लाखाची फसवणूक | पुढारी

Nashik fraud : हळदीच्या प्रोजेक्टसाठी उद्योजकाची १५ लाखाची फसवणूक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; हळदीच्या प्रोजेक्टसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून एका उद्योजकाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुभाष देशमुख (५०) यांची चिंचवड येथील प्रीती प्लाझा येथे गुडविल ट्रान्स अॅण्ड लॉजिस्टिक कंपनी आहे. दरम्यान, आरोपी रोहित पाटील (रा. गोविंदनगर) याने फिर्यादी देशमुख यांना त्यांच्या हळदीच्या प्रोजेक्टसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखविले. पाटील याने दिलेल्या माहितीवर फिर्यादी देशमुख यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी पाटील याने कर्ज काढून देण्याच्या बदल्यात विविध कारणांसाठी १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. मात्र तीन वर्षे उलटूनही कर्ज मिळत नसल्यामुळे त्यांनी आरोपी पाटील याच्याकडे या कर्जप्रकरणाबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.

सदर प्रकार हा १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत नाशिक-मुंबई महामार्गावरील अंबड येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये घडला. आपली फसवणूक होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी अंबड पोलिस ठाण्यात आरोपी रोहित पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button