Dhule Crime : जुन्या वादाची खुन्नस; वृद्धेसह तिच्या मुलींना मारहाण | पुढारी

Dhule Crime : जुन्या वादाची खुन्नस; वृद्धेसह तिच्या मुलींना मारहाण

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; जुन्या वादाची खुन्नस काढून एका वृद्ध महिले सह तिच्या मुलींना घरात घुसून बेदम मारहान केल्याची घटना टिटाने गावात घडली. निज़ामपुर पोलिस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dhule Crime

टिटाने गावात राहणारी मलेका पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी राहणारी तंजुम पिंजारी ही मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत होती. त्यावेळी मलेका पिंजारी यांनी शिवीगाळ करू नको असे बजावले. त्यानंतर तंजुम ने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मलेकाने घाबरून घराचे दरवाजे लावून घेतले व आपल्या मुलींन सोबत घरातच थांबली.  थोड्याच वेळात तंजुम ने तीचा पती बादशाह सह अन्य दोन लोकांना घेऊन घराचा दरवाजा तोडून घरात घुसले आणि मलेका व तिच्या दोघा मुलींना बेदम मारहाण केली. कसे तरी तेथून पळ काढत त्यांनी जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात धाव घेतली.  पोलिसांनी त्यांना जैताने येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवले व घटनेची माहिती घेत निज़ामपुर पोलिस स्टेशनचे सपोनी. हनुमंत गायकवाड यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा :

Back to top button