धुळे : भाडणे शिवारात परवाना न घेता व्यवसाय ; 59 क्विंटल कापूस जप्त  | पुढारी

धुळे : भाडणे शिवारात परवाना न घेता व्यवसाय ; 59 क्विंटल कापूस जप्त 

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यावर कारवाई करून तब्बल 59 क्विंटल कापूस जप्त केल्याची कारवाई साक्री बाजार समितीच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परवाना न घेता व्यापार करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद खंडपीठ व जिल्हा उपनिबंधक कार्यालय धुळे यांच्या आदेशान्वये 2023-24 या वर्षात व्यापार करण्यासाठी माथाडी बोर्डाकडे मालक नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, काही व्यापारी नोंदणी न करताच शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साक्री बाजार समितीचे सचिव भूषण बच्छाव, माथाडी बोर्डाचे निरीक्षक दयानंद बोडरे, संदीप अहिरराव, नितीन तोरवणे यांच्या भरारी पथकाने नवापूर रोडलगत भांडणे शिवारात एका व्यापाऱ्याच्या गोदामावर कारवाई करून तब्बल 59 क्विंटल 55 किलो कापूस जप्त केला. दरम्यान, बेकायदेशीरपणे व्यापार करून शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे साक्री बाजार समितीच्यावतीने कळविण्यात आले.

या कारवाईसाठी साक्री पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, यांच्यासह कॉन्स्टेबल इरफान शेख,पोलिस नाईक कलीम पटेल यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

Back to top button