Nashik Sinnar : शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे हृदयविकाराने निधन | पुढारी

Nashik Sinnar : शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे हृदयविकाराने निधन

सिन्नर (जि.  नाशिक) पुढारी वृत्तसेवा; सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रहिवाशी तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. अंत्यविधी सकाळी 10. 30 वाजता डुबेरे अमरधाम येथे होणार आहे.

अंबादास वाजे यांचे वय 55 वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. वाजे यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी अविरतपणे काम केले. शिक्षक संघाचे केंद्र प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. पुढे तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, नाशिक जिल्हा सरचिटणीस, नाशिक जिल्हाध्यक्ष, राज्य कोषाध्यक्ष आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून संघटनेने राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. मंगळवारी देखील ते प्राथमिक शिक्षकांच्या कामकाजा संदर्भात बाहेरगावी होते. तेथून परतत असताना मध्यरात्री दीडच्या सुमारास डुबेरे गावात पोहोचत असताना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने सिन्नर येथे दवाखान्यात उपचारांसाठी हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

हेही वाचा :

Back to top button