Nashik News : अंबडला सहा भंगार गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

Nashik News : अंबडला सहा भंगार गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर येथील सहा भंगार गोदामाला मध्यरात्री आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी ४ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर दातीर मळा परिसरात रात्री दोन वाजता येथील सहा भंगार गोदामाला आग लागली. या आगीची माहिती मिळताच सिडको, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीततील मुख्यालय येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचारी यांनी ४ तासाच्या अथक परिश्रमा नंतर पहाटे सहा वाजेपर्यंत लागलेली आग विझवली. या आगीत गोडाऊन मधील पुठ्ठे, प्लॅस्टिक, प्लॉयउड जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी अंबड पोलिस ठाणे, सातपूर पोलिस ठाणे व औद्योगिक वसाहत चुंचाळे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गोडाऊनला आग कशी लागली हे समजू शकले नाही.

हेही वाचा :

Back to top button