malaria vaccine : मलेरियाच्या दुसर्‍या लसीला ‘WHO’ची मंजुरी; भारतात लसीची किती किंमत? | पुढारी

malaria vaccine : मलेरियाच्या दुसर्‍या लसीला ‘WHO’ची मंजुरी; भारतात लसीची किती किंमत?

जीनिव्हा, वृत्तसंस्था : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मलेरियाची दुसरी लस (malaria vaccine) मंजुरी दिली. आता ही लस डासांपासून होणारा प्राणघातक मलेरिया रोखण्यास फायदेशीर ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी ‘डब्ल्यूएचओ’ने मलेरियाच्या ‘आरटीएस-एस’ या पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. आता नवीन लस 2024 च्या अखेरपर्यंत जगभरासाठी उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला मलेरिया या दुसर्‍या लसीचा वापर काही आफ्रिकन देशांत केला जाणार आहे; तर दुसरीकडे अन्य देशांत 2024 चा मध्य आणि अखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकेल.

‘डब्ल्यूएचओ’चे महानिदेशक टेड्रस अधानम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य यंत्रणेच्या दोन विशेषज्ञांच्या पथकाच्या सल्ल्यानुसार मलेरियाच्या नव्या लसीला मान्यता दिली आहे. या लसीची मात्रा दोन अथवा चार डॉलरला विकली जाईल. याबाबत महाराष्ट्रातील पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही याला दुजारो दिला आहे. या लसीची निर्मिती करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने सिरम इन्स्टिट्यूटला परवाना दिली आहे.

भारतात लसीची किंमत 166 रुपये (malaria vaccine)

‘बीबीसी’च्या माहितीनुसार, ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत तयार करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातील सर्वाधिक लस निर्माण करणार्‍या कंपनीच्या सहकार्याने दरवर्षी 10 कोटी लसींची निर्मिती केली जाईल. या लसीची किंमत भारतात 166 रुपये असून, मलेरिया झालेल्या रुग्णाला या लसीचे चार डोस द्यावे लागतील, असे सांगण्यात आले.

 

Back to top button