Nashik Crime : वागदर्डी धरणावर फिरायला गेलेल्या तरुणींवर हल्ला | पुढारी

Nashik Crime : वागदर्डी धरणावर फिरायला गेलेल्या तरुणींवर हल्ला

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मनमाड येथील वागदर्डी धरण परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुणींवर अज्ञात दुचाकीचालकाने हल्ला करीत त्यांच्याकडील १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भामट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड येथील काजल अरुण निकाळे (२८, रा. पंचवटी कॉलनी, रेल्वे क्वाॅर्टर पाण्याच्या टाकीजवळ, मनमाड) व तिची नातेवाईक श्वेताली संजय कांबळे या दोघी आपल्या दुचाकीवरून वागदर्डी धरण परिसरात फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी काजल व श्वेताली यांची विचारपूस करत एकाने त्यांच्या हातातील गलोरने काजलच्या नाकाजवळ मारून तिला दुखापत केली. त्यानंतर दुसऱ्याने श्वेताली हिच्या डाव्या कानाजवळ व खांद्यावर दगड मारून दोघींना जखमी केले. श्वेताली खाली पडल्यावर त्याने तिच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेत दुचाकीवरून पळ काढला.

या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button