पक्षीही एकमेकांकडून शिकतात गाणी, बनवतात नव्या धून

पक्षीही एकमेकांकडून शिकतात गाणी, बनवतात नव्या धून
Published on
Updated on

न्यूयॉर्क : निसर्गाचा एक अनोखा चमत्कार म्हणजे 'गाणारे पक्षी'. आपल्या मधूर आवाजात हे पक्षी एखादी 'ट्यून' ऐकवतात त्यावेळी आपण खरोखरच थक्क होत असतो. एका नव्या संशोधनानुसार पक्षीही एकमेकांकडून गाणे शिकत असतात तसेच त्यामध्ये सुधारणाही करण्याचा प्रयत्न करीत असतात. माणसाप्रमाणेच तेही संगीत किंवा धून बनवतात.

आजपर्यंत अशा बर्डसाँगने बॉब मार्ले ते मोझार्टपर्यंत अनेक संगीतकारांना प्रेरणा दिली आहे. नव्या संशोधनात स्पष्ट झाले की, मानवी संगीतकारांना बर्डसाँगबद्दल वाटणार्‍या आत्मियतेस वैज्ञानिक आधार आहे. या संशोधनानुसार, त्यांच्या रचनाही आपल्याच सुरांसारख्याच आहेत. ज्याप्रमाणे मानवी बोलणे त्याच्या संगीतापेक्षा वेगळे असते. त्याचप्रमाणे पक्ष्यांचे बोलणे, जे इशारा व संवादाच्या इतर प्रकारांमध्ये दिसून येते, ते पक्ष्यांच्या गाण्यांपेक्षा वेगळे आहे.

सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधील प्राणीशास्त्रज्ञ ऑफर चेनिचोव्स्कींच्या मते, 'आम्ही संगीताची व्याख्या करू शकत नाही. ते संगीतही बनवतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.' संशोधनाचे परिणाम भक्कम पुरावे देतात की, पक्ष्यांचे गाणे मानवी संगीताप्रमाणेच बनलेले आहे. साँगबर्डस् त्यांचा टेम्पो (वेग), स्पीच (ते किती उच्च किंवा कमी गातात) आणि टिंबरे (सूर) मध्ये बदल करून गाणे गातात. जे मानवी सुरांसारखेच असतात. न्यूरोबायोलॉजिस्ट व पक्षीसंगीत तज्ज्ञ टीना रोस्के म्हणतात, "लय आणि ताल यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर पक्ष्यांच्या गाण्यातही केला जातो."

'इन द हॉल ऑफ द माऊंटन किंग' ही प्रसिद्ध धून जशी संथगतीने वेगाने जाते, त्याचप्रमाणे बुलबुलही सांगते. डॉ. रोस्के म्हणतात, 'पक्ष्याचे गाणे माणसाला चांगले वाटू शकते; परंतु पक्षी ज्या वेगाने गातात, तो वेग मानवाच्या तुलनेत चारपट आहे. म्हणूनच ती लय समजून घेणे आणि त्याचा आनंद घेणे आपल्यासाठी खूपच कठीण आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जेफ्री जिंग म्हणतात, ताल व वाक्यरचनेचा संबंध असल्याचे संशोधनात आढळलेे. ऑस्ट्रेलियन बुचरबर्डस् गाण्याच्या रचनेच्या विश्लेषणाद्वारे हे तथ्य सापडले. व्हायोलिनवादक हॉलिस टेलरने जिंगसोबत ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात बुचरबर्डच्या तालबद्ध रचनांची नोंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news