Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त | पुढारी

Nashik : सिडकोत कारसह एक लाखांची दारू जप्त

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”true” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”10″ order=”DESC” orderby=”post_date” view=”carousel” /]

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अवैध दारू बाळगणे व विक्रीस बंदी असताना सिडकोतील उत्तमनगर भागात अवैध दारूविक्री करणारे संशयित हेमंत अशोक धोंगडे उर्फ हेमंत पाटील याला अंबड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून नॅनो कारसह एक लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अवैध दारू बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश निर्गमित केले आहेत.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलिस शिपाई प्रवीण राठोड यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, पोलिस नाईक पवन परदेशी, सचिन करंजे, दीपक शिंदे, अनिल ढेरंगे यांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार कैलास चव्हाण व पोलिस शिपाई अमीर शेख अधिक तपास करीत आहेत.

[web_stories title=”true” excerpt=”true” author=”false” date=”true” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”1″ order=”DESC” orderby=”post_date” view=”list” /]

हेही वाचा : 

Back to top button