

पुढारी ऑनलाइन डेस्क : पळपुटा हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला Mehul Choksi Case भारतात पुन्हा आणणे आता आणखी अवघड झाले आहे. अँटिगुआ आणि बारबुडाच्या न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाशिवाय चोक्सीला त्यांच्या देशाच्या सीमेबाहेर नेता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच इंटरपोलने चोक्सीला जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली होती. मेहुल चोक्सी हा भारतात 13 हजार कोटींच्या घोटाळा करून फरार झाला आहे.
भारतातून पळून गेल्यावर मेहूल चोक्सी Mehul Choksi Case सध्या अँटिगुआ व बारबुडा या देशात वास्तव्यास आहे. त्याने तेथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्याच्या वकिलांनी म्हटले की 23 मे 2021 मध्ये त्याच्या अपहरणाचा डाव रचून त्याला जबरदस्तीने डोमिनिकाला नेण्यात आले होते. या प्रकरणी त्याने अँटिगुआ आणि बारबुडा पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच एंटिगुआच्या अॅटॉर्नी जनरल आणि पोलिस प्रमुखांकडे त्याच्या विरोधात दाखल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अँटिगुवाचे अॅटॉर्नी जनरल आणि पोलिस प्रमुखांचे या प्रकरणी तपास करण्याचे दायित्व आहे. तसेच डोमिनिका देशात त्याच्यासोबत झालेल्या व्यवहराबाबत डोमिनिका पोलिसांकडे चौकशी करण्यात यावा, असा दावा त्याने अँटिगुवाच्या दिवाणी न्यायलालयात दाखल केला.
चोक्सीने अँटिगुआच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर चोक्सीच्या वकीलांनी युक्तीवाद केला. चोक्सीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अँटीगुआच्या न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशाशिवाय मेहुल चोक्सी याला देशाच्या सीमेबाहेर नेता येणार नाही. तसेच न्यायालयाने डोमिनिकन पोलिसांना चोक्सीने दावा केल्या प्रमाणे त्याच्या इच्छे विरोधात जबरदस्ती नेले जात होते का याची पुष्टी करण्याचे आदेशही दिले आहे.
मेहूल चोक्सीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा जिंकल्याने इंटरपोलने त्याच्या विरोधात जारी केलेली रेड कॉर्नर नोटिस गेल्या महिन्यात मागे घेतली. त्यामुळे भारत वगळता मेहुल चोक्सी कोठेही निर्धास्तपणे प्रवास करू शकतो. त्याला कोणत्याही देशाच्या विमानतळावर किंवा सीमेत अटक करता येणार नाही.
भारतातून पळ काढल्यानंतर मेहुल चोक्सी हा सध्या अँटिगुआ आणि बार्बुडा या देशात वास्तव्यास आहे. अँटिगुआ आणि बार्बुडा हा अमेरिका खंडातील आहे. हा देश कॅरिबियन समुद्राच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगुआ व बार्बुडा या दोन बेटांवर वसला आहे. याची राजधानी सेंट जॉन्स ॲंटिगुआ या बेटावर आहे.
हे ही वाचा :