नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी | पुढारी

नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2 च्या दरम्यान सातपूर आयटीआय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारतीत आयोजन केले आहे. मेळाव्यात महिंद्रा ईपीसी इरिगेशन लि., युवाशक्ती फाउंडेशन नाशिक आणि मिराक्वई व्हेन्च्युयर्स प्रा. लि. कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखती घेणार आहेत. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button