नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे | पुढारी

नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू - ॲड. नितीन ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

देशाचा मानबिंदू हा शेतकरी आणि सीमेवरील जवान आहे. या दोन घटकांकडे भारतीयांनी केवळ गरज म्हणून न बघता त्यांचा योग्य त्या ठिकाणी मानसन्मान झालाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ‘जय जवान जय किसान’ म्हणता येईल. असे मत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.

चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथे भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील 70 सैनिकांचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ते बोलत होते. मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे चांदवड तालुका प्रतिनिधी डॉक्टर सयाजी गायकवाड सोनेवाडी बुद्रुक येथील कानिफनाथ आश्रमाचे प्रमुख अण्णा बाबा दिगंबर गिरी महाराज डॉक्टर मनोज ठोके हे उपस्थित होते. उर्दूळ येथील माजी सरपंच स्व. जगन्नाथ काशिनाथ खुटे पुण्यस्मरणानिमित्ताने ग्रामस्थांनी व खूटे परिवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्यनुसार शेतकरी कुटुंबातील सैनिकांचा आयोजित सन्मान व गौरव आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात सैनिक शरद कुठे यांच्या ‘एकच राजा इथे जन्मला’ या गीताने झाली यावेळी प्रमुख अतिथी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय जगन्नाथ खुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रास्ताविक बाजीराव ठाकरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने योगेश खुटे ,रवी खुटे, बाबाजी नामदेव खुटे, एकनाथ तुकाराम खूटे,सोपान खुटे शामराव खुटे केदु खुटे दगू विठ्ठल खुटे रमेश तुकाराम खुटे कौतिक दगू खूटे यांनी केला. कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी परिवारातील 75 सैनिकांचा व दहा माजी सैनिकांचा सन्मान सन्मानपत्र सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. ठाकरे म्हणाले की, भारत देश हा कृषिप्रधान देश असून अन्नदाता व संरक्षक हे त्याचे घटक असून या दोन्ही घटकांना प्रत्येक भारतीयांनी योग्य तो मानसन्मान दिलाच पाहिजे. याचे कारण एक देश जगवतो तर दुसरा देश जागवतो. म्हणून ‘जय जवान जय किसान’ असे जर अभिमानाने म्हणायचे असेल तर आपण शेतकरी आणि सैनिक यांचा मानसन्मान केलाच पाहिजे. अध्यात्मिक गुरु दिगंबर महाराज यांनी सैनिक आणि शेतकरी यांच्या प्रती भारतीयांची जबाबदारी यावर प्रकाश टाकत या दोन्हीही घटकांचे आपण आयुष्यभर ऋणी राहिले पाहिजे. कारण त्यांचे अनन्यसाधारण उपकार आपल्यावर आहे असे म्हटले. यावेळी गणेश पवार व उमेश विजय शिंदे माजी सुभेदार त्र्यंबकराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश सलादे तर आभार सतीश मांदळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उर्दू गावातील युवक व खूटे परिवार आणि इच्छापूर्ती ग्रुप यांनी परिश्रम घेतले सांगता महाराष्ट्र गीत गर्जा महाराष्ट्र माझा यांनी झाली.

हेही वाचा:

Back to top button