नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध | पुढारी

नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकाला रास्त भाव मिळावा, सरकारने प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि.3 महाविकास आघाडीने धरणे आंदोलनासह रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. यासंदर्भात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाने १५०० रुपये अनुदान द्यावे. तसेच सन २०१८ मध्ये तालुक्यात गारपीट होवून रब्बी पिकांचे ९७ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. परंतु,अदयापही भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कोंडाईबारी ते अक्कलपाडापर्यंत साक्री तालुक्यातील गावांचा सव्हीॅस रस्ता अतिशय खराब झाला असून येथील गावांना दिशादर्शक फलकही नाहीत. त्यामुळे यावर सात दिवसात उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा तीव्र  स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे तहसीलदारांना देण्यात आला आहे. यावेळी खासदार बापूसाहेब चौरे, आमदार डि.एस.अहिरे, मा. जि.प.सदस्य उत्तम बापू देसले, रमेश बापू अहिरराव, सुभाष काकुस्ते, कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेना चोरडीया, विजय भामरे, शिवसेनेचे नितीन सोनवणे, पंकज सूर्यवंशी, सभापती शांताराम कुवर, उपसभापती माधुरी देसले, उपसभापती नरेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.नरेंद्र तोरवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख किशोर वाघ, डॉ.दिलीप चोरडिया, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, नगरसेवक बाबा शिंदे, गिरीश नेरकर, पिंटू देसले, विलास देसले, प्रज्योत देसले, भरत जोशी, अक्षय सोनवणे, मंगेश नेरे, रावसाहेब खैरनार, नितीन सोनवणे, पंकज सूर्यवंशी, सुहास सुर्यवंशी, हरिष मंडलिक, गिरीश नेरकर, अविनाश शिंदे, करिम शहा, पंकज भामरे, गणेश गावित आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button